। मुरूड । वार्ताहर ।
नांदगावच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे बुधवार दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी 11वा. नारळ फोडी खेळण्याच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या पटांगणामध्ये हे सामने खेळविण्यात येणार आहेत.सदर सामन्यात भाग घेण्यासाठी 500 प्रवेश फी ठेवण्यात आली आहे, प्रथम क्रमांकांच्या विजेत्या खेळाडूस .पंधरा हजार रोख रक्कम व आकर्षक चषक,दुसर्या क्रमांकास दहा हजार, आकर्षक चषक तर तिसर्या व चौथ्या क्रमांकांना प्रत्येकी रोख रक्कम सात हजार व आकर्षक चषक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सामन्यात मुरुड सह मुंबई, अलिबाग, श्रीवर्धन,रोहा आदी भागातील नामवंत खेळाडू आपल्याकडील अस्सल खेळी नारळ घेऊन सहभागी होत असल्याने सामने पाहण्यास प्रेक्षक मोठी गर्दी करतात.