वातावरणातील बदलामुळे माथेरानमध्ये गुलाबी थंडी

| माथेरान | वार्ताहर |
राज्यभरात वातावरणात बदल झालेला जाणवत असताना माथेरान मधील वातावरणात देखील बदल झालेला पहावयास मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण असून सूर्य दर्शन देखील क्वचितच होत आहे. परंतु या वातावरणातील बदलामुळे येथे हवेत गारवा जाणवत असून येणारे पर्यटक खुश झाले आहेत.

सध्या राज्यात सर्वत्र झालेल्या वातावरण बदलामुळे काही भागात पाऊस तर काही भागात कोरडे दमट वातावरण निर्माण झाले आहे.माथेरान सारख्या उंच पर्यटनस्थळावर देखील वातावरणात बदल झालेला पहावयास मिळत असून येथे मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण झालेले दिसत आहे. यामुळे सूर्य दर्शन देखील दिवसातून क्वचितच होत आहे. सकाळ पासून सर्वत्र धुके पसरलेले पहावयास मिळत आहे.आणि या धुक्यामुळे मात्र हवेत चांगलाच गारवा वाढला आहे. येथे पाऊस पडतो की काय असेच वातावरण तयार झालेले दिसत आहे. आणि येथे मधल्या दिवसात येणारे पर्यटक सुद्धा या गारेगार हवे मुळे खुश झाले आहेत. आत्ता पुढील पंधरा दिवसांत नाताळ हंगाम सुरू होणार असून नाताळ हंगामात माथेरानला येणार्‍या पर्यटकांना इथल्या थंडीची मस्त मजा लुटता येणार आहे. आणि आत्ता पुढील नाताळ हंगामासाठी माथेरानकर देखील तयारीला लागलेले दिसत आहेत.

आम्ही दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात माथेरान फिरण्यासाठी येतो. परंतु यावेळी येथे दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे.यामुळे आम्हाला थंडगार व आल्हाददायक वातावरणाची मजा घेता आली माझे सर्व कुटुंबीय खुश झाले. येथे जास्त प्रमाणात जरी थंडी नसली तरी देखील हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. – अकिल शेख,पर्यटक मुंबई

Exit mobile version