अंतिम मतदार याद्यांसाठी सहकार्य करा

| पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या करीता दिनांक 27 व 28 नोव्हेंबर रोजी पेण तालुक्यात विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. तरी पेण तालुक्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी मतदान केंद्रावर भेट देउन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना नं 6 भरुन द्यावे. तसेच पेण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदार यादीमधील नोंदी दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नवीन नाव नोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहोचविण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून अंतिम मतदार याद्यांच्या कामासाठी नगरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पेण तहसिल निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version