चार जण गंभीर जखमी
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापुरात निपाणी-देवगड राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. बोलेरो आणि ट्रकच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
हा अपघात निपाणी-देवगड राज्य महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडला. सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रकने बोलोरो गाडीला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि, या अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (28), आकाश आनंदा परीट (23) आणि रोहन संभाजी लोहार (24) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सणासुदीला एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर अज्ञात ट्रकचालकाने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.