महामार्गावर वाहनांची धडक; दोघेजण गंभीर जखमी

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील नडगाव हद्दीत सोमवारी (दि.27) चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दोन पिक अप, एक स्कॉर्पिओ व एक केटीएम दुचाकी यांची धडक होऊन दोघेजण जखमी झाले.


स्कॉर्पिओ (एमएच 04 ईजे 6730), पिकअप (एमएच 07 एजे 2010) व केटीएम दुचाकी( एमएच 06 सीसी 5675) स्वार महाडच्या दिशेकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणार्‍या दुसर्‍या पिकअपने (एमएच 07 एजे 6064) पहिल्यांदा दुचाकीला जोरदार धडक दिली. नंतर स्कॉर्पिओ व पिकअपवर आदळला. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सुरज पवार आणि राहुल वाघमारे अशी दोन जखमींची नावे आहेत. त्यांना जखमी अवस्थेत महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.

Exit mobile version