। दिल्ली । वृत्तसंस्था ।
मनोरंजन विश्वातून चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे.वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुरू होते.
राजू जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते.
अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले आहे. कॉमेडिचा बादशहा अशी त्याची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे.