पनवेल येथे जिल्हा काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ

पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथे जिल्हा काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ जिल्हा अध्यक्ष मा. श्री आर. सी. घरत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुख्य नोंदणीसाठी म्हणून 13 जणांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात प्रदेश उपाध्यक्ष कलावत ,अभिजित पाटील ,धनंजय क्षीरसागर यांनी टप्प्या टप्प्याने नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन उपस्थिताना केले. या मुख्य नोंदणीकर्त्यांनी बूथ दोन नोंदणी कर्त्यांची नियुक्ती 6 फेब्रुवारी पर्यंत करावयाची आहेत याची सविस्तर माहिती दिली यावेळी अनंत पाटील मल्लिनाथ गायकवाड, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, मोहन गायकवाड, माया अहिरे, अनुपमा चुढा, लतीफ शेख, मर्फी म्हसकर, तुषार पवार, सागर पगारे, जयदास पाटील, किरण तळेकर, जालन्दर लोखंडे, भारती जळगावकर, सुरेश पाटील आणि अ‍ॅड. अरुण कुंभार उपस्थित होते.

Exit mobile version