जलजीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील पवेळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येणार्‍या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी खंडाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक थळे, सदस्य नरेश गोंधळी, विनोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संतोष गुरव, विलास वालेकर, विलास थळे, नासिकेत कावजी, प्रशांत वारीक, संकेत पाटील, विकास मानकोळे,  पवेळे ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या हर घर जल अंतर्गत जलजीवन मिशन योजना पवेळे गावांतील नागरिकांसाठी राबविली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 42 लाख 56 हजार 542 रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या योजनेमुळे पवेळे गावातील शेकडो नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

Exit mobile version