जे.एस.एम.महाविद्यालयात लसीकरण अभियानास प्रारंभ

पहिल्या दिवशी 44 विद्यार्थ्यांनी घेतला अभियानाचा लाभ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयात लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत पहिल्या दिवशी 44 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील, सेक्रेटरी अजित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ड. गौतम पाटील, उपाध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या अभियानात सहभागी होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे व ङ्गमिशन युवा स्वास्थ्यफ यशस्वी करावे, असे आवाहन यावेळी अ‍ॅड. गौतम पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर हेही उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या सहकार्याने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आरोग्य खात्याच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात ङ्गमिशन युवा स्वास्थ्य अभियानफ दिनांक 25 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात येणार आहे. दि.20 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत व पुढील सत्रातही महाविद्यालयाचे नियमित वर्ग सुरू राहण्याचे संकेत आहेत. शासनाच्या व मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अजूनही कोविड-19 लस घेतलेली नाही असे सर्वेक्षणावरून आढळून आले आहे.
ङ्गमिशन युवा स्वास्थ्यफ कार्यक्रमाच्या अंतर्गत अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयातही दिनांक 25 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. महाविद्यालयात दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. लसीकरणासाठी येत असताना आपले आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावे. तसेच आपले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा इतर कोणतेही ओळखपत्र सोबत आणावे. तसेच येताना मास्क घालून यावे, सुरक्षित अंतर ठेवावे असेही आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागात हे अभियान विभागीय सहसंचालक डॉ.संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. ए.व्ही.जाधव (7721813636) व प्रा. पी.डी.दातार (9422494583) यांच्याशी संपर्क साधावा.


18 वर्षावरील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लस घेतली नाही तसेच या कालावधीत जे विद्यार्थी दुसरा डोस घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी 44 विद्यार्थ्यांनी ह्या अभियानाचा लाभ घेतला आहे. पुढील सात दिवस हे अभियान सुरु राहणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे.

डॉ.अनिल पाटील
प्राचार्य

Exit mobile version