म्हसळा येथे विविध विकासकामांचा प्रारंभ

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील ताम्हाणे शिर्के येथील गावदेवी मंदिर आणि गावातील विविध विकासकामांची भूमिपूजने सदानंद शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.

गावातील अत्यंत पुरातन आणि पूर्णपणे जीर्ण झालेल्या या गावदेवी मंदिर बांधणे अत्यावश्यक असल्याने ताम्हाणे शिर्के आणि कासार मलईगावातील ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि तसा संकल्पही सोडला. गावाच्या विकासातील एक महत्वाचे आधारस्तंभ ठरलेले सेवानिवृत्त कर्मचारी सदानंद शिर्के यांनी ही बाब मनावर घेतली आणि गावदेवी मंदिरासह गावाची पाणीयोजना योजनेतून मंजुर झाल्यामुळे तीचेही काम, तसेच भेंडीचा ओहोळ येथील साकवाचे काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेऊन त्या ही कामाचे भूमिपूजन सदानंद शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी दोन्ही गावचे ग्रामस्थ व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी आपलें मनोगत व्यक्त करताना सदानंद शिर्के (भाई) यांनी आज आपले गाव खर्‍याअर्थाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आणि याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. यासाठी संपूर्ण गावातील तरुणांनी आपले योगदान देऊन हातभार लावावा असे आवाहन सदानंद शिर्के यांनी केले.

Exit mobile version