पाणी योजनेच्या कामास सुरुवात

। तळा । वार्ताहर ।

तळा शहराच्या पाणी योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित तळा शहराची पाणी योजना आता पूर्णत्वास जाईल, अशी आशा तळावासीयांना आहे.

गेली कित्येक वर्षे तळा शहराच्या पाणी योजनेचे काम हे अडकून पडले होते. पाणी योजनेवरून पक्षपक्षात पेटलेले राजकारण आणि श्रेयवादाची लढाई पाहून ही योजना नक्की पूर्ण होईल की नाही, याबाबत तळावासीयांमध्ये संभ्रमावस्था होती. या पाणी योजनेचे भूमिपूजन कोण करणार यावरूनही स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद पहायला मिळाले होते. शेवटी 17 फेब्रुवारी रोजी तळा शहराच्या पाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. भूमिपूजन पार पडल्यानंतर दोन ते महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तळा शहराच्या पाणी योजनेच्या कामाला वावे हवेली येथे सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version