सुरईतील स्मशानभूमी शेडच्या कामाचा शुभारंभ

अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नांतून जि.प.चा निधी मंजूर
। रेवदंडा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथे स्मशानभूमी शेडच्या नूतन बांधकामाचे भूमीपूजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. बोर्ली ग्रा.पं. सदस्य व माजी सरपंच भारती बंदरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

शेकापक्षाचे जि.प. प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शेष फंड निधीतून सुरई येथील स्मशानभूमी नूतन बांधकामाचा नियोजित काम करण्यात येत आहे. या कामासाठी शेकापचे स्थानिक कार्यकर्ते यांनी सातत्याने मागणी लावून धरली होती, त्यासाठी मुरूड पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागावकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हे नियोजित स्मशानभूमी शेड नूतन बांधकाम करण्यात येत आहे.

सुरई येथील स्मशानभुमी नूतन बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी माजी सभापती रमेश नागावकर, मुरूड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व शेकापक्ष मुरूड तालुका सहचिटणीस सी.एम. ठाकूर, बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, साळाव ग्रा.पं. माजी उपसरपंच मधु पाटील, बोर्ली ग्रा.पं. माजी सरपंच व सदस्य भारती बंदरी, शेकापक्ष विद्यार्थी प्रमुख विनायक शेडगे आणि सुरई ग्रामस्थ उपस्थित होते.

उसरोली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये शेकापक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे राबविण्यात आली असून, पुढील काही दिवसांत अनेक विकासकामाची पूर्तता विभागात करण्यात येईल, असे रमेश नागावकर यांनी सांगितले.

Exit mobile version