गोखले महाविद्यालयात ‌‘कॉमर्स डे’ साजरा

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचा आयक्यूएसी विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने नुकताच वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. कल्याणी नाझरे यांनी विद्यार्थ्यांना कोणतीही शाखा निवडताना आपली आवड, विषयाची रुची आणि भवितव्याच्या संधी यांचा विचार करून निर्णय घ्यावा, असे सांगितले. प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, अल्पसंतुष्ट न राहता आपल्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून आपले उज्वल भवितव्य घडवावे, असा मोलाचा संदेश दिला. आय क्यू ए. सी. समन्वयक, डॉ. निलेश चव्हाण यांनी ‘मूलभूत विषयांच्या ज्ञानाबरोबरच भवितव्य घडविताना कौशल्यांची किती गरज आहे’ हे समजावून सांगितले.

Exit mobile version