शरद पवारांना आयोगाची नोटीस

। मुंबई । प्रतिनिधी ।
भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. या आधीही जुलै महिन्यात शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version