। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खांब व एकता फाऊंडेशन यांच्या वतिने ‘तिमिरातून तेजाकडे’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर खांब ग्रामपंचायतीमध्ये रविवार, दि.15 मे रोजी पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यवान रेडकर (अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क विभाग, वित्त मंत्रालय) हे उपस्थित होते.
यावेळी खांब राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, सरपंच मानसी चितळकर, माजी सरपंच रंजना टवळे, दत्तात्रय वातेरे, पोलीस पाटील मनोज सावरकर, एकता ग्रुपचे किशोर महाबले, मंगेश महाबले, साक्षी क्लासेसचे शिक्षक प्रवीण पिंपळकर, शिक्षक किशोर जाधव, चंद्रकांत अधिकारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम करिअरसाठी स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम त्यासाठी लागणारी मेहनत या विषयांसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भविष्यात आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल, अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय वातेरे व आभारप्रदर्शन मनोज सावरकर यांनी केल







