माजी सभापती संजय जांभळेंविरुद्ध तक्रार

। पेण । प्रतिनिधी ।
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी माजी जि.प.सभापती संजय जांभळे यांच्याविरोधात पेण पं.स.चे माजी सदस्य प्रदीप म्हात्रे यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. डोलवी ग्रामपंचायतीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच प्रदीप म्हात्रे यांनी संजय जांभळे यांच्या विरूध्द पोलीस अधिक्षक रायगड यांच्याकडे न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार केली आहे.

आपल्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, संजय जांभळे हे राजरोसपणे गावात फिरून कार्यकत्यांना व मतदारांना दमदाटी करून शांततेचा भंग करत आहेत. तरी त्यांच्यावर योग्य ती शासकीय पातळीवर कार्यवाही करून प्रतिबंध घालावा.

या संदर्भात संजय जांभळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार दिला आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने माझ्या विरूध्द तक्रार केली. परंतु मोघम तक्रार करण्यापेक्षा मी कुणाला दम दिला, मी शांततेचा भंग कसा केला हे जर तक्रारीत सांगितले असते तर प्रशासनाला देखील त्याची मदत झाली असती. मात्र राजकीय द्वेशापोटी ही तक्रार झाली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे कोणतेही कृत्य केले नाही तथा न्यायालयाचा अपमान केला नाही. तक्रारदाराचे म्हणणे आहे, तर त्यांनी तशा प्रकारे पुरावे द्यावेत आणि प्रशासनाला मदत करावी.

Exit mobile version