खा. महाडिक यांच्याविरोधात तक्रार

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने खासदार प्रा. संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव रघुनाथ विष्णू कांबळे (रा. साळोखे मळा, कदमवाडी) यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

तर, संजय मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मतदारांना अमिष दाखविल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. ऐन निवडणूकीच्या काळात त्यांनी शांतता भंग घडविण्याच्या उद्देशाने खोटी व चुकीचे विधाने केली आहेत. शाहू छत्रपतींच्याबद्दल जनतेच्या मनात चांगली भावना असताना त्यांची प्रतिमा मलिन करण्याची कृती खासदार मंडलिकांनी केली असल्याने त्यांच्यावर त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल कराव अशी मागणी केली आहे.

Exit mobile version