पेट्रोल पंप मालका विरुध्द तक्रार

| पेण | प्रतिनिधी |

पांडापूर येथील पेट्रोलपंपाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख हिराजी चोगले यांच्याकडे स्थानिकांच्या वरंवार तक्रारी जात असल्याने अखेर जनहितासाठी त्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पांडापूर येथील पेट्रोल पंपा विरूध्द तक्रार नोंदवली आहे.

पांडापूर येथे एच.पी. कंपनीचा पेट्रोल पंप मालक निरज धर्मराज दुबे यांच्या मालकीचा आहे. तो सुरू होऊन 20 ते 25 वर्षे झालेली आहेत. परंतु सुरू झाल्यापासून येथे अद्यापर्यंत फक्त डिझेलचीच विक्री केली जात आहे. येथे पेट्रोल उपलब्ध केलेले नाही. हा पेट्रोलपंप नागोठणे ते वडखळ च्या दरम्यान महामार्गावर आहे. परंतु येथे पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक नागरीक व आजूबाजूच्या परिसरातील गावताल नागरिकांना पेट्रोलसाठी 15 ते 20 कि.मी. वडखळ किंवा नागोठणे येथे पेट्रोलसाठी जावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक वेळ व पैसा वाया जातो. तसेच हा पेट्रोलपंप महामार्गावर असून देखील रात्रीच्या वेळी अनेक वाहनधारकांना पेट्रोल न मिळाल्यामुळे त्यांनी गैरसोय होत असते. असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच सदरील पंपाची चौकशी करुन नियमाप्रमाणे डिझेल बरोबर पेट्रोल विक्री करणेबाबत सुचना दयाव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिले जाईल, असा इशाराही चोगले यांनी दिला आहे.

Exit mobile version