। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील मुमताज इमरान कासकर या महिलेने विवाहित असून पासपोर्टमध्ये अविवाहित असल्याची खोटी नोंद करुन शासनाची फसवणूक करीत पासपोर्ट तयार करणार्या पती विरोधात पासपोर्ट अधिकारी (ठाणे) व रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात कारवाईची मागणी केली आहे.
पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, माझे पती इमरान शरफुद्दीन कासकर यांनी सन 2016 मध्ये त्यांनी परदेशात नोकरीनिमित्त जाण्यासाठी नविन पासपोर्ट बनविले होते. पासपोर्टचा फॉर्म भरताना त्यांनी विवाहीत/अविवाह मध्ये लग्न झाले असून सुध्दा अविवाहीत अशी नोंद केली आहे. पासपोर्ट मिळाल्यावर माझे पती नोकरीनिमत्त दुबई येथे नोकरीकरीता गेले, त्यांनतर त्यांनी मला व माझे 3 मुलांशी कोणताही सबंध ठेवलेला नाही. ज्या कंपनीमध्ये ते काम करीत आहेत तेथे त्यांनी अविवाहीत आहेत, असे सांगितलेले आहे. तसेच, पासपोर्टवर त्यांनी आई, वडील यांचे नाव दाखविण्यात आलेले आहे. पासपोर्ट फॉर्म भरताना जे दोन ओळखीचे पुरावे द्यावे लागतात. त्या दोन साक्षीदारांनी खोटी साक्ष दिली आहे. पासपोर्ट मुरुड पोलीस ठाणे येथे चौकशी करीता आले असता या तिघांनी संगनमत करुन पोलीस स्टेशनला अविवाहीत असल्याची खोटी माहीती दिलेली आहे.
या चारही व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यांत यावा व पासपोर्ट तातडीने रद्द करण्यांत यावे. रायगडचे पोलीस अधीक्षक व संबंधित पासपोर्ट विभागाने तक्रारीची दखल घेऊन याप्रकरणी योग्यती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.