| पनवेल | वार्ताहर |
दोन नागरी प्राथमिकआरोग्य केंद्रआणि तीन प्रभाग कार्यालये बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता-बाल संगोपन केंद्राचे संकल्प चित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांच्या निविदा तयार करणे, ही सर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना आयुक्त गणेश देशमुख बांधकाम विभागास दिल्या.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकासकामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 28 जून रोजी मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे, लेखापरीक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे यांच्यासह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.