रस्ते आणि गटारांची कामे पूर्ण करा

द्वारकारनगरी महिला बचतगटाचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन
| उरण | वार्ताहर |

व्दारकानगरी महिला बचतगट बोरीपाखाडीच्यावतीने साईप्रेरणा कॉलनीतील गेली 10 वर्षे अंतर्गत रस्ते आणी बंदिस्त गटारे उरण नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असल्याने ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मागणीचे निवेदन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना देण्यात आले. ही कामे लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी अध्यक्षा सीमा अनंत घरत, उपाध्यक्ष वृशाली कदम, सचिव अमृता गायकवाड, खजिनदार सुवर्णा पाटील, सहप्रिया कासकर, हर्षदा सतेरे, भक्ती चौव्हान उपस्थित होते.

Exit mobile version