संकटकालीन बचाव प्रशिक्षण संपन्न

। पेण । प्रतिनिधी ।

पेण एसटी आगरात दोन गटांमध्ये तुंबल मारामारी झाली. याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांनी पोलीस तुकडीला आदेश दिले. तात्काल पोलीस तुकडीने दंगल खोरांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाण्यात रवाना केले. काही काळ पेण बस स्थानकात असणार्‍या प्रवाशांना काय प्रकार चालला आहे हे समजत नव्हते. एकंदरीत बस स्थानकात तणावाचा आणि चर्चेच वातावरण तयार झाले होते. परंतु, खुप वेळानंतर हे मॉक ड्रिल असल्याचे प्रवशांच्या लक्षात आले.पेण पोलीस ठाण्यामार्फत पेण एसटी आगरात संकटकालीन बचाव प्रशिक्षण घेण्यात आले होते. आणीबाणीच्या वेळी किंवा आपातकालीन स्थितीत बर्‍याच वेळेला प्रशासनाची तारांबळ उडत असते. ही तारांबळ उडू नये म्हणून दंगल जन्य परिस्थिती कशी हाताळता येईल याचे प्रात्यक्षित करण्यात आले होते. यामध्ये पेण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी तसेच विक्रम मिनीडोअर व रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version