व्हिस्टा कंपनीकडून रुग्णालयाला संगणक भेट

| पनवेल | वार्ताहर |

व्हिस्टा फूड्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला देणगी दाखल तीन संगणक संच सुपूर्द करण्यात आले असून, लगेच कार्यान्वित सुद्धा करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण, रुग्णालयातर्फे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ, डॉ. सकपाळ, डॉ. जठार तसेच कंपनीचे प्लांट हेड प्रवीण ठाकूर, एच.आर. डिपार्टमेंटच्या इंद्रायणी आगलावे, प्रथमेश पाटील, आय टी डिपार्टमेंटचे अजित मिश्रा, रुग्णालय कर्मचारी, शिवसेना महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला ॲड. प्रथमेश सोमण यांनी प्रास्तविक करून चंद्रशेखर सोमण व ग्रामीण रुग्णालयाची धडपड अधोरेखित केली तसेच यापूर्वीही डिसेंबर 2019 मध्ये व्हीस्टा कंपनीकडून रुपये पाच लाखांची औषधे ही एसआर फंडातून दिल्याचे विशेष करून नमूद केले. चंद्रशेखर सोमण व उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलमधील डायलिसीस केंद्र व आय.सी.यू. केंद्राला विशेष करून भेट देऊन तिथे उपचाराधीन रुग्णांशी संपर्क साधला.

याप्रसंगी शिवसेना पनवेलचे महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहर संघटक अभिजीत साखरे, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, विभागप्रमुख अविनाश साफल्य, शाखाप्रमुख किरण पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी, उपस्थित आदी उपस्थित होते.

Exit mobile version