सारडे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट

| उरण | प्रतिनिधी |

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक व माहिती-तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे आणि त्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाऊनटाऊन यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, सारडे येथे संगणक भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाऊनटाऊनच्या अध्यक्षा हेतल खोना, सचिव भारती विक्रमसी तसेच क्लब सदस्य आशिता दावडा व मीनल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्लबकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला आकाश फाउंडेशन मुंबईच्या सचिव संजीवनी शृंगारे, सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका समृद्धी वऱ्हाडी, शिक्षिका अपूर्वा घरत, रश्मी पवार, वनिता पाटील, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, कृषी मित्र प्रकाश माळी, हॉटेल एमडीएसचे मालक नितीन म्हात्रे, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जयेश म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक म्हात्रे, उपाध्यक्ष उज्वला पाटील, सदस्या पूनम पाटील, कविता म्हात्रे, मंगेश पाटील, मदतनीस ज्योत्स्ना पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version