अलिबागमध्ये हिंदी, मराठी गीतांची मैफील

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी आदर्श संगीत संध्या

 । अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अलिबागमध्ये हिंदी, मराठी गीते आणि नृत्यांची बहारदार मैफील आयोजीत केली आहे. आदर्श संगीत संध्या या कार्यक्रमांतर्गत सुखद आनंद अलिबागकरांना रविवार (दि.7) रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून समुद्रकिनारी पहायला मिळणार आहे.

अलिबागमधील आदर्श नागरी पतसंस्था गेल्या 25 वर्षापासून सेवा देत आहे. रौप्य महोत्सवाची सुरेल साठवण संगीत संध्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवता येणार आहे. प्रसिध्द गायिका वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अलोक काटरे, संपदा गोस्वामी, प्रिती जोशी-निमकर, दत्ता मेस्त्री आदींच्या सुरेल आवाजासह नृत्यांचे सादरीकरण या कार्यक्रमातून होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन कुणाल रेगे करणार आहे. या उपक्रमातून अलिबागकरांना बहारदार गाण्यांचा व नृत्यांचा आनंद लुटता येणार आहे.

Exit mobile version