। भाकरवड । वार्ताहर ।
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ग्रामस्थ मंडळ धामणपाडा आयोजित आणि सौजन्य मंडळ प्रस्तुत गीतरामायण आणि मराठी-हिंदी गीतांच्या सुरेल मैफीलीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात दीपक धुमाळ, प्रशांत म्हात्रे, जुईली पाटील-म्हात्रे, आर्य धुमाळ या गायकांनी आपल्या गाण्यांतून रसिकांची मने जिंकली. तसेच सचिन धुमाळ यांनी आपल्या बासरीच्या मधुर सुरातून प्रेक्षकांना मोहीत करून टाकले. तर स्वप्नील धुमाळ यांनी आपल्या माऊथ ऑर्गन वादनाने कार्यक्रमात आणखी रंगत आणली.
या कार्यमाचे निवेदन श्रीगणेश म्हात्रे यांनी केले, तर जगदीश पाटील यांनी तबला व ढोलकीची साथ दिली.शार्दूल भगत याने सिंथेसायजर, नितेश जुईकर याने ऑक्टोपाड, निमिष जुईकर याने पखवाज, संजय धुमाळ यांनी साईड रिदम, अनिकेत पाटील यांनी क्लॅपबॉक्स, अशी वादकांची साथसंगत लाभली.
सर्व धामणपाडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गायक व वादक कलाकारांनी आपल्या कलेतून प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केले, अशी प्रतिक्रिया श्री. प्रविण म्हात्रे यांनी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केली.