पॉस्को कंपनीविरोधात उपोषणाची सांगता

| माणगाव | प्रतिनिधी |
विळेभागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश जंगम,विळे वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे,माणगाव तालुका अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर उतेकर,एस.पी.लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर संतोष पोलेकर यांनी माणगाव पोलिस ठाण्याजवळ आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन स्थानिक भूमीपुत्रांच्या पाठीशी भाजप राहील असे सांगितले. यावेळी रविभाऊ मुंढे, संजय ढवळे,नाना महाळे,सुरेंद्र साळी, प्राजक्ता शुक्ला, शर्मिला सत्वे, यशोधरा गोडबोले, उमेश साटम, बाबुराव चव्हाण, संजय जाधव,राजु मुंढे उपस्थित होते.

Exit mobile version