महिला उपासिका मार्गदर्शन शिबिराचा समारोप

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
भारतीय बौद्धमहासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा पेणच्यावतीने चंद्रकांत सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवस पेण बुद्धनगर येथील जेतवन बुद्धविहात घेण्यात आला. महिला उपासिका शिबिराचे रायगड जिल्हा अध्यक्षा संपदा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या 52 महिला उपासिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्हांने सन्मानित करण्यात आले. एम. जी. शिंदे, पांडुरंग जाधव, प्रतिभा जाधव, आंनद जाधव, मंगेश कांबळे, सुभाष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्षा संपदा चव्हाण, मारुती शिंदे, संतोष चव्हाण,पांडुरंग जाधव, प्रतिभा जाधव, आनंद जाधव, नरेश गायकवाड, मंगेश कांबळे, शशिकला गायकवाड, गंगाराम गायकवाड, कैलास जाधव,सुभाष चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले.

Exit mobile version