कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सांगता

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
मल्लविद्या कुस्ती संकुल पोलिस मुख्यालय, कळंबोली येथे आयोजित मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 9) पार पडला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड, नवी मुंबई पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रेडक्लीपच्या प्राचार्या अग्रवाल, सहायक पोलिस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, पोलिस निरीक्षक कृष्णा धामापूरकर, राखीव पोलिस निरीक्षक रवींद्र पडवळ, एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी कुस्ती मॅट, तसेच ओपन जिम सुरू करण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version