| नेरळ | वार्ताहर |
नेरळ कशेळे या राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारे ग्रामपंचायतीमधील साई मंदिरपासून कोल्हारे फाटा या भागातील राज्यमार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.
उरण- पनवेल- नेरळ कशेळे भीमाशंकर मंचर हा भीमाशंकर राज्यमार्ग अन्य भागातून वळविला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. म्हणून नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेऊन कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने साई मंदिरापासून कोल्हारे फाटा या भागातील 200 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम अखेर पूर्ण झाले आहे. पूर्ण पावसाळा त्या भागातील रत्स्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु होते. त्याचवेळी त्या भागातील रस्त्याची एक लेन पूर्ण झाल्यांनतर पुन्हा दुसरी लेन चे बांधकाम करण्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.मात्र या रस्त्याचे बांधकाम अखेर पूर्ण झाले असून रस्त्यावरून आता पुन्हा वाहतूक सुरु झाली आहे.त्यामुळे सातत्याने खड्डेमय असलेल्या साई मंदिर कोल्हारे फाटा रास्तवरून वाहतूक करणे आता रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे सोपे झाले आहे.