उरणमध्ये रस्त्यांचे कॉक्रीटीकरण

| उरण | वार्ताहर |
पावसामुळे उरण नगर पालिकेच्या पाठिमागे असलेल्या नजीरशेठ अपार्टमेंट येथे रस्त्याचे पालिकेने काँक्रिटीकरण केले आहे. पावसाळ्यात येथे चिखल निर्माण होत असे  पाणी भर रस्त्यात साचल्याने तसेच रस्त्यात अनेक खडडे असल्याने या रस्त्यावरून नागरिकांना नीट चालताही येत नव्हते.वाहनांना येण्या जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नव्हता.मात्र ही नागरिकांची समस्या लक्षात घेऊन  पालिकेचे शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख गणेश पाटील यांनी सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. सदर रस्ता गणेश शिंदे, गणेश पाटील यांनी दुरुस्त करून तो रस्ता सिमेंटचा बनवून दिला.

Exit mobile version