उस्मानाबाद । प्रतिनिधी ।
उस्मानाबाद येथील स्वातंत्र्य सेनानी माजी खा. नरसिंगराव देशमुख यांच्या पत्नी शशिकलाताई देशमुख यांचं निधन झाले होते. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, प्रदेश अध्यक्षा कोमलताई साळुंके, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी शेकापचे नेते राज्य मध्यवर्ती समिती सदस्य अॅड अविनाशराव देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी अनिकेत देशमुख सह परीवारातील सदस्य उपस्थित होते.