पत्रकार किरण बांधणकर यांना पितृशोक

। पेण । प्रतिनिधी ।

पत्रकार किरण बांधणकर यांना पितृशोक झाले आहे. किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर हे पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करायचे. आपला व्यवसाय खुप मेहनतीने त्यांनी पुढे नेला. सुरूवातीला बैलगाडी मार्फत रेतीचा व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपल्या व्यवसायात भरभराटी निर्माण करत ट्रकद्वारे ठिकठिकाणी रेती सप्लाय व बांधकामाचे साहित्य सप्लाय करून आपला संसाराचा गाडा सुरळीतपणे पार पाडत. आपल्या मुलाबाळांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात यशस्वी झाले. बबन बांधणकर हे पहिल्या पासूनच रुबाबदार आणि संघटन प्रिय व्यक्ती होते. त्यांनी कोंबडपाडयात कोंबडपाडा वासियांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करून कोंबडपाडा विभागाची एक मोट बांधली आणि आजही ती एकीची मोट कायम आहे.

मात्र त्यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी दुखःद निधन झाले आहे. पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार असून त्यांच्यावर अत्यसंस्कार विश्‍वेश्‍वर स्मशानभूमीत झाले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा व पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version