मान्यवरांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती कळताच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले आहे. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील अनेक मंडळींनी पेझारी येथे जाऊन पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.


मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ज्या नेते मंडळींना त्यांना अखेरचा निरोप देता आला नाही, त्यांनी शनिवारी (दि.30) पेझारी येथे त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाटील कुटुंबियांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अनिल परब, आदिती तटकरे यांच्यासह गोपाळ अग्रवाल, सांगोल्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी पेझारी येथे जाऊन आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील आदी पाटील कुटूंबिय व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version