| अलिबाग | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (दि.29) सकाळी निधन झाले. निधनाची वार्ता कळताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून पेझारी येथे जाऊन पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी रविवारी (दि.31) पेझारी येथे जाऊन विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार शिरीष शिंदे, आमदार विश्वजीत कदम, नितीन सरदेसाई, माजी आमदार अवधूत तटकरे यांनी आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील आदी पाटील कुटूंबिय व कार्यकर्ते उपस्थित होते.















