जयंत पाटील यांच्याकडून शिंदे कुटुंबियांचे सांत्वन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

खानाव ग्रामपंचायतीचे सदस्य रामदास शिंदे यांच्या आई रेवती नामदेव शिंदे यांचे शुक्रवारी (दि.2) वृद्धपकाळाने वयाच्या 85 वर्षी निधन झाले. शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस जयंत पाटील यांनी रामदास शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, शरद वरसोलकर, प्रमोद घासे, योगेश गुजर, अनंत मोकल, नितीन पाटील, सुरेश खोत, दिनेश टोपले व संतोष म्हात्रे हे उपस्थित होते.

Exit mobile version