। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठांवत कार्यकर्ते माजी सरपंच अविनाश ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बुधवारी (दि.12) ठाकूर कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अविनाश ठाकूर यांनी बामणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गेली अनेक वर्ष कारभार सांभाळला. सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत बामगावचे ते अध्यक्ष होते. तसेच, गेली अनेक वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी सेवा केली होती. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्रीडा व सहकार क्षेत्रात ते सक्रीय होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. या निधनाची माहिती मिळताच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बुधवारी (दि.12) सकाळी वढाव खुर्द येथील ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, कावीरचे माजी सरपंच राजेंद्र म्हात्रे, सतिश भगत, विजय कुंटे, सुरेश म्हात्रे, अनंत थळे, राम थळे, लंकेश नागावकर, राजेंद्र उळे आदी मान्यवरांसह अंजिक्य ठाकूर, अतिश ठाकूर व ठाकूर कुटूंबिय व कार्यकर्ते उपस्थित होते.