। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ (रजि.) तर्फे महाबोधी महाविहार मुक्ती समर्थनार्थ तालुक्यातील समाज बांधवांनी अलकापुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून दत्तवाडी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, नगरपरिषद, हुतात्मा चौक, हनुमान मंदिर, दरबार रोड अशी रॅली काढण्यात आली. तसेच, तहसीलदार रोहन शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. यावेळी स्थानिक तालुका समिती अध्यक्ष सुरेश तोरे, धर्मेश मोरे, अशोक जाधव, सुधाकर कांबळे, राजेश गायकवाड, मंगेश मोरे, गौतमी मोरे, माधुरी शिंदे, नितीन कोंजिरकर, रविंद्र गायकवाड, जिविंद्र मोरे, मनोहर तांबे, नितीन गायकवाड, गौतम मोरे यांच्यासह संस्थेचे इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.