महसूल पंधरवडा सप्ताहाचे आयोजन

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

राज्यातील नागरिकांना अधिकाधिक शासन योजनांची माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्‍वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने गुरूवारी (दि.1) महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने तहसिल कार्यालयामध्ये विशेष शिबीर आयोजित करुन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेच्या अर्जाची ऑनलाईन छाननी सुरु असुन पंचायत समिती कार्यालय व नगर परिषद कार्यालयामध्ये देखिल या योजनेच्या अर्जांच्या छाननीचे काम सुरू होते. दुपारी 4 वाजेपर्यत 3 हजार अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आलेली आहे.

Exit mobile version