किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा संपन्न

। खांब । वार्ताहर ।

सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नेहमीच समाजासाठी विविधांगी उपक्रम राबविणार्‍या जीवनधारा संस्थेच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न करण्यात आली.

कार्यशाळेची सुरुवात ऑलरिना मस्करनस, कॉलेज स्टुडन्ट प्रीती मिंज, जीवनधर कार्यकर्ता नम्रता वाघमारे, दोन किशोरी मुली प्रणाली जाधव, कुमारी आनंदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यशाळेत 36 वाड्यांमधून 60 किशोर वयातील मुलींनी सहभाग घेऊन विविध माहितीचै संकलन केले. शिक्षण आणि कला कौशल्य या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत शिक्षणाबाबत एक व्हिडिओ दाखवून त्यातून त्यांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे दाखवले गेले . तसेच कला कौशल्य व आपल्या बोलण्याच्या चालीरीती पद्धती कशा असायला हव्या याचाही व्हिडिओ दाखवून प्रबोधन केले.तर याच समाजातील नम्रता वाघमारे हिने मनोगत व्यक्त करून आपल्या जीवनाचा व शैक्षणिक वाटचालीचा खडतर प्रवास मांडला. सदरील कार्यशाळा हीकॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई येथील विद्यार्थीनी प्रीती मिंज, अनिशा तोरस्कर, सिमरन पॉल यांनी आयोजित केली होती.शेवटी स्नेहभोजन करून व उपस्थित विद्यार्थ्यींना भेटवस्तू भेटवस्तू देऊन कार्यशाळेची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली.

Exit mobile version