शनिवारी चौल-सागमळा येथे कार्यशाळेचे आयोजन
| चौल | प्रतिनिधी |
दहावी-बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. दरम्यान, पाठारे क्षत्रिय समाज शिक्षण फंड चौल यांच्या वतीने दहावी, बारावी व नोकरी शोधत असणार्या मुला, मुलींसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करुन तरुणाईच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे.
शनिवार, दि. 13 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान ही कार्यशाळा पाठारे क्षत्रिय समाज हॉल, सागमळा येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत उच्च शिक्षणाच्या संधी, सरकारी व खासगी नोकरी, करिअरबाबत विशेष मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येईल. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क सुहास पाटील, सॉफ्टवेअर अभियंता व्यवस्थापक- नामांकित बहुद्देशीय संस्था अमेय नागावकर आणि सॉफ्टवेअर अभियंता व्यवस्थापक- नामांकित बहुद्देशीय संस्था आशिष नाईक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण फंड अध्यक्ष आर.डी. नाईक 9545607080, उपाध्यक्ष श्री. म्हात्रे 9221163332, सचिव श्री. गोंधळी 8888400067 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.