श्रीवर्धन शहरांत शिवसेना शिंदे गटात दुफळी निर्माण
श्रीवर्धन | वार्ताहर |
शिंदे गट स्थापन झाल्यापासून हिरीरीने काम करणारे श्रीवर्धन शिवसेना शहर प्रमुख श्री देवेंद्र भुसाणे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करून शहर संघानेला विश्वासात न घेता करण्यात आलेली शहर प्रमुख पदाची नवीन नियुक्ती बाबत शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी राजीनामे फरकावण्याचा निर्णय घेतला असून आमदार भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली आसता याबाबत योग्य निर्णय येत्या १५ तारखेला श्रीवर्धन येथे घेण्यात येईल अस आमदार भरतशेठ गोगावले यांनी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना आश्वासित केल आहे.
श्रीवर्धन मधील शिवसेना शहर संघटनेकडून नवीन नियुक्ती बाबत नाराजी व्यक्त करत आमदार भरतशेठ गोगावले यांची महाड येथील निवास्थानी भेट घेतली होती. यावेळी शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक यांनी शहरप्रमुख पदी देवेंद्र भुसाणे यांनाच कायम ठेवण्याची मागणी केली होती. अन्यथा सर्व पदाधिकारी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती, यावेळी सर्व पदाधिकारी यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका सर्व तुमच्या मनासारखं होईल. यावर शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी नव्याने केलेल्या नियुक्तीवर तात्काळ स्थगितीचे आदेश दिले असून शहरप्रमुख देवेंद्र भुसाणे यांनी आपलं संघटनेचे काम सुरु ठेवाव अस आदेश आ. गोगावले यांनी दिला.
शहरप्रमुख पदाचा निर्णय येत्या १५ मे रोजी आमदार भरतशेठ गोगावले यांचा श्रीवर्धनचा नियोजित दौरा आहे. त्यावेळी याचा विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याच आ. भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं आहे. यावेळी तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, माजी उपनगराध्यक्ष संजय नरवणकर, माजी शहरप्रमुख संतोष वेश्विकर, मनोज नेवरेकर, उप सहरप्रमुख सावन तवसाळकर, विभाग प्रमुख संजय आंबेकर, सुरेंद्र तबीब, युवा सेना सहरप्रमुख अजय चव्हाण, उपशहरप्रमुख अक्षय भाटकर, शाखा प्रमुख सतीश कदम, माळी, बबलू, महादेव रघुवीर, शैलेश चौगुले महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.