विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन

। नागोठणे । वार्ताहर ।

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे सहसंचालक डॉ. अ. म. जाधव व प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक गावित यांचे मार्गदर्शनाखाली मुंबई विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मुलाखती व कॅम्पस मुलाखती सध्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बीटीआरआय महाड व नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील शेठ ओ. एस. परमार डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्या वतीने भव्य कॅम्पस मुलाखतीचे आयोजन शेठ ओ. एस. परमार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आले आहे. बोईसर येथील कॅलेक्स केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड त्यांच्या मार्फत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version