| पनवेल | प्रतिनिधी |
पंचायत समिती कार्यालयात प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. योग्य नियोजनाचा अभाव आणि अपुरी व्यवस्था यामुळे पालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागले. अनेक पालक लहान मुलांसह आले असून त्यांना उकाड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व सावलीची सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाकडून वेळापत्रकाचे योग्य नियोजन न झाल्याने एकाच वेळी मोठी गर्दी उसळली. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे प्रक्रिया अधिकच संथ झाली. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.







