विरोधी पक्षांचा ठिय्या आंदोलन
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीदरम्यान सोमवारी (दि. 17) पुन्हा एकदा प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवत निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर बसून ठिय्या आंदोलन केले. यामुळे सभागृहात काही वेळ मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शेकाप आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी आरक्षण प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप करीत निवडणूक अधिकारी तसेच पालिका आयुक्त यांना याबाबतचे निवेदन सादर केले. पनवेल महानगरपालिका आरक्षण सोडत आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके नाट्यगृहामध्ये होती.
पालिका आरक्षण सोडतीत गोंधळ
