• Login
Thursday, May 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अखेर जिल्हा रुग्णालय प्रशासन ताळ्यावर

Antara Parange by Antara Parange
April 10, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अखेर जिल्हा रुग्णालय प्रशासन ताळ्यावर
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरसीएफच्या सीएसआर निधीवरून गोंधळ
‘निरंक’ उत्तरामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) कंपनीकडून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून देण्यात आलेल्या मदतीवरून मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरातून हा प्रकार उघड झाला आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार, सन 2020-21 या आर्थिक वर्षात आरसीएफ कंपनीकडून जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांना सुमारे 74.69 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, सुरुवातीला या निधीबाबत ‘निरंक’ माहिती देण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता.

आरसीएफने सन 2020–21 मध्ये सिव्हिल हॉस्पिटलसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी 74.69 लाखांचा निधी रुग्ण कल्याण समितीकडे वर्ग केला. त्यानंतर सन 2022–23 मध्ये तब्बल 1.37 कोटी किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे थेट रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये फुल्ली ऑटो हॉरिझॉन्टल स्टेरिलायझर, ऑपरेशन टेबल, इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन टेबल, एबीजी मशीन, अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन, फॅको इमल्सिफिकेशन मशीन, OCT मशीन, रक्तदाब मोजण्याची उपकरणे यांचा समावेश आहे.

या अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे रुग्णालयाची निदान व उपचार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, विशेषतः शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. याच कालावधीत 18.35 लाख किमतीची आवश्यक औषधे पुरवण्यात आली असून, याचा थेट फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना झाला आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी आरसीएफने पुढाकार घेत, रायगड जिल्ह्यात PSA ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 54.89 लाखांचा निधी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीमार्फत उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे ऑक्सिजन पुरवठा अधिक सक्षम झाला आणि गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी मोठा आधार मिळाला.

सन 2024–25 मध्येही आरसीएफने आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हाय-टेक नर्सिंग सेंटर उभारण्यासाठी 25.73 लाखांचे सहाय्य दिले. तसेच, डायलिसिस विभागासाठी आवश्यक औषधे व सोल्यूशन्स खरेदीसाठी 20 लाखांची अतिरिक्त मदत देण्यात आली आहे. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना सातत्यपूर्ण आणि जीवनावश्यक उपचार मिळणे अधिक सुलभ झाले आहे.

एकूणच, आरसीएफच्या CSR उपक्रमांमुळे सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथील आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. आरसीएफकडून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास क्षेत्रात अशाच प्रकारे सातत्याने योगदान दिले जात असून, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट होते असे नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

कोविड निधीबाबत गैरसमज
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केले आहे की, संबंधित निधी कोविड-19 संदर्भात देण्यात आलेला नसल्याने माहिती देताना गैरसमज झाला. त्यामुळे त्या काळात निधी मिळाल्याची नोंद असूनही 'निरंक' माहिती देण्यात आली होती. प्रशासनाच्या मते, हा निधी रुग्णालयातील दुरुस्ती कामे तसेच आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री खरेदीसाठी वापरण्यात आला असून सुमारे 74.48 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
2022-23 मधील उपकरणे देणगी प्रकरण
याशिवाय, दुसऱ्या पत्रानुसार सन 2022-23 या कालावधीत आरसीएफ कंपनीमार्फत सीएसआर अंतर्गत उपकरणे, साधनसामुग्री व यंत्रसामुग्री देणगी स्वरूपात जिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही उपकरणे प्रत्यक्षात 1 एप्रिल 2023 रोजी रुग्णालयात प्राप्त झाली होती. त्यामुळे त्या आधीच्या कालावधीत माहिती मागितल्यावर नोंदीत ती दिसत नसल्याने 'निरंक' उत्तर देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती मान्य करण्याचे आवाहन
रुग्णालय प्रशासनाने दोन्ही प्रकरणांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत स्पष्टीकरण देत, सादर केलेली वस्तुस्थिती मान्य करण्याची विनंती संजय गंगाराम सावंत यांना लेखी पत्र देऊन केली आहे. तसेच, देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीचे फोटोही जोडण्यात आल्याचे नमूद केले आहे.
नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह
दरम्यान, एकीकडे मोठ्या प्रमाणावर निधी आणि उपकरणे मिळाल्याचे स्पष्ट होत असताना, सुरुवातीला 'निरंक' माहिती देण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान आरसीएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे यांनी या प्रकरणात खुलासा करताना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने निगमत सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमांमुळे अलिबागसह परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत.

Related

Tags: alibagalibag newsAlibaugindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad District General HospitalRCF's CSR Fund
Previous Post

मुंबई विमानतळावर आग

Next Post

कळंबोली सर्कल येथे अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू 

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

Raigad Included MMRDA Zone: बांधकाम परवानग्यांसाठी आता मुंबईच्या फेऱ्या?

May 27, 2026
sliderhome

अलिबागमध्ये महिलेचा विनयभंग

May 27, 2026
भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट
पनवेल

भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टार्गेट

May 27, 2026
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
कर्जत

शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा

May 27, 2026
PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव
sliderhome

PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

May 27, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

May 27, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

कळंबोली सर्कल येथे अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?