उत्तर प्रदेशमध्ये जाहीर सभा न घेण्याचा काँग्रेसचा निर्णय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पाश्‍वभूमीवर सध्या तरी जाहीर सभेचे आयोजन न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. प्रचार करण्यासाठी व्हर्च्युअल रॅलीवर भर देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसने बरेली येथे मंगळवारी विद्यार्थी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघनही झाले. चेंगराचेंगरीमुळे काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्यामुळे आता काँग्रेसने वाराणसी आणि आझमगडमध्ये आयोजित मॅरेथॉन स्पर्धाही रद्द केली आहे. या स्पर्धा आझमगड आणि वाराणसीमध्ये अनुक्रमे 5 व 9 जानेवारी रोजी होणार होत्या.

Exit mobile version