काँग्रेसमुळेच देश आरोग्यसेवांपासून वंचित – पंतप्रधान नरेंद्र मोदी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरोग्यविषयक सेवासुविधांकडे आवश्यक ते लक्ष पुरविले नाही. आणि यामुळेच देश आरोग्यसेवांपासून वंचित असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी वाराणसीत 5200 कोटी रुपयांहून अधिक विकास योजनांचे उद्घाटन केले आहे. याशिवाय आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची देखील सुरुवात केली आहे. याप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोरोना महासाथीविरोधातल्या या लढ्यामध्ये देशाने 100 कोटी लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बाबा विश्‍वनाथ, माँ गंगाचा आशीर्वाद आणि काशीमधील लोकांच्या या श्रद्धेमुळेच मसर्वांन लस, मोफत लसफ ही मोहिम यशस्वीरित्या पुढे जात आहे.

Exit mobile version