केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींना धक्का

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.4) जाहीर झाला. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली असुन, तामिळनाडूत विजय थलपतिच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकून मोठा विजय मिळवला आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच निकालाने देशाच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. केरळमध्ये इतर राज्यांत अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या काँग्रेस पक्षाने दमदार पुनरागमन करत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. 140 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसने 62 जागांवर आघाडी घेतली असून, काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीने जवळपास 101 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे केरळमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक आघाडी घेत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजपने 293 जागांपैकी 194 जागांवर आघाडी घेतली असून तृणमूल काँग्रेसला केवळ 93 जागाच सांभाळता आल्या. तर, तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी करत पारंपरिक द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांना कडवी टक्कर दिली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असणाऱ्या टीव्हिके पक्षाने 234 पैकी 109 जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच आसाम, पुद्दुचेरीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आघाडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
एकूणच, या पाच राज्यांच्या निकालांनी देशातील राजकारणाला नवे वळण दिले असून, पुढील काळात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाच राज्यांचा निकाल
पश्चिम बंगाल
भाजप- 208
तृणमूल काँग्रेस- 79
काँग्रेस -02
डावे पक्ष- 01
इतर-3
तामिळनाडू
द्रमुक- 74
अण्णाद्रमुक-52
टीव्हीके-108
इतर-0
केरळ
काँग्रेस-102
डावी आघाडी -35
भाजप - 3
इतर-0
आसाम
भाजप-102
काँग्रेस- 21
एआययुडीएफ -02
इतर-1
पुद्दुचेरी
भाजप- 21
काँग्रेस-05
इतर-4
Exit mobile version