फलक हटवण्याचे काँग्रेसने दिले निवेदन

। पनवेल । प्रतिनिधी।

मुंबईमध्ये वादळी पावसामुळे जे काही वित्तीय आणि मनुष्यहानी झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होल्डिंग असतील किंवा इमारती मटेरियल असेल त्यामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण आणि वित्तीय नुकसान भोगावे लागलेले आहे. याच अनुषंगाने पनवेल महापालिकेला महिला काँग्रेसच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

पनवेल महापालिका ही राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी महापालिका आहे. पनवेल मध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. कारण फार मोठ्या प्रमाणात व्यापारी बाजारपेठ पनवेलमध्ये आहे. त्याच अनुषंगाने आपल्या उद्योगाचा किंवा आपल्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात जाहिरातीद्वारे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं, एक माध्यम म्हणून होर्डिंग लावली जातात. तसेच पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरणाच्या माध्यमातून इमारती निर्माण करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आपल्या इमारतीच्या संदर्भात माहिती फलक मोठ्या प्रमाणात सर्वत्र लावतात. महापालिकेच्या क्षेत्रात होल्डिंग हे जाहिराती फलक लावण्यासाठी भाडेतत्त्वावरती देण्यात येतात. याच अनुषंगाने भविष्यात कोणत्याही प्रकारे नागरिकांचे नुकसान अथवा इजा होऊ नये. म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित जाहिराती फलकांसाठी नियम तयार करून तसेच जो कोणी ठेकेदार असेल त्याला होल्डिंगच्या देखभाल संदर्भात सक्त ताकीद किंवा सूचना देण्यात यावी. असे निवेदन पनवेल महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड अतिक्रमण विभाग यांना पनवेल महिला काँग्रेस तर्फे देण्यात आले.

Exit mobile version